STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

कधी येईल पाऊस

कधी येईल पाऊस

1 min
27K


कधी येईल पाऊस, कधी पिकणार शेती।

बी शेतात पेरावे, पीक पिकणार किती।।

बीज अंकुरण्यासाठी, पाणी शेतात जीरवा।

शेत नांगरण्यासाठी, औत शेतात फिरवा।। 

 नाही केली नाला बंदी, नाही जिरवल पाणी।

नाही बांधले धारण, नाही अडवलं पाणी।।

पाणी आडवा जिरवा, करा नालाबंदी सारी।

अशा घोषणा देऊन, केली भलावण भारी।। 

भेगाळलेल्या जमिनीत, काय पिकणार शेती।

लोटाभर पाण्यासाठी, माय करी पाय पिटी।।

नाही पिण्यासाठी पाणी, नाही खाण्यासाठी दाना।

व्याकुळल्या जीवाला, कोणी पाणीही पाजीना 

झाड-झुडपं तोडले, केले डोंगर बोडके।

घर पैशाने भरलं, परी रिकामे मडके।।

पैसे असून खिशात, काय खाशील पोटाला।

घोटभर पाण्यासाठी, जीव पाण्याशी मुकला।।


Rate this content
Log in