काव्यमय कोडे
काव्यमय कोडे
1 min
820
खोड माझे खडबडीत
पाने आहेत मोठी,गोल
उन्हाळ्यातही उभा मी
सावरुनी स्वतःचा तोल.
चापट शेंगा माझ्या जणू
वाळवणातील पापडी
तीन पानांची संगत सदा
खेळती आपडी थापडी.
फ्लेम ऑफ फारेस्ट मी
म्हणजे अग्नी रानातला.
लालभडक फुलांचाच
निष्पर्ण वृक्ष मी वनातला.
द्रोण बनती पानांचे अन्
पत्रावळी जेवायला छान.
फुलांच्या गडद रंगासंगे
गाऊ धूलिवंदनाचे गान.
तीन अक्षराचे नाव माझे
पलाश आहे संस्कृतमध्ये
स्वरचिन्हविरहित नाव ते
सांगा तुम्ही मराठीमध्ये.
