STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

काव्य म्हणजे...

काव्य म्हणजे...

1 min
14.7K


काव्य म्हणजे

प्रतिभारुपी वेलीवर बहरलेलं फूल असतं

  काव्यउर्मीतून  जन्मलेलं मूल असतं 

नकळत पडलेलं निरागस पाऊल असतं

असीम भक्तीच प्रतिकरुपी राऊळ असतं 

काव्य म्हणजे    

उत्कट भावनांचा उद्रेकी लाव्हारस असतं

अवखळ  निरागस, नटखट मूल  असतं

प्रांजळ मनानं कबूल केलेली भूल असतं 

ऊर्मिलेनचं लक्ष्मनावरचं अबोल प्रेम असतं  

काव्य म्हणजे  

प्रेमीयुगलांची परस्परांशी असलेली ओढ असतं

खाचखळ्ग्यांनी भरलेला रस्ता असतं 

व्दिदल धान्याला फुट्लेला मोड असतं

सुपीक मेंदूची न मोड्णारी खोड असतं  

काव्य म्हणजे    

शब्दरूपी भावनांची ते एक  सुरेख गुंफण असतं

काव्य कसं जन्मतं? ते कधीच न उलगडणारं कोडं असतं 

वेड्या मनाला लागलेलं ते एक खूळ असतं 

तर कधी ते आभासी  म्रिगजळ असतं

काव्य म्हणजे

कवीमनात चाललेलं झंझावती वादळ  

रिमझिम बरसणारे आनंददायी बादल  

निसर्ग रम्य  वातावरणी  बेभान नाचणारा मोरं असतं

मायावी शक्तीन वश करणारं  चित्तचोर असतं 

काव्य म्हणजे

संतवाणी तर कधी सुकर जगण्याची प्रेरक शक्ती

माणसाला माणूस म्हणून वागवण्याची शिकवण 

मनसोक्त घ्यावं संस्कृतीचं जिवापाड जपावं

हवं तेवढं वाचावं, लिहावं मनातं आकंठ साठवावं  

काव्य म्हणजे

न्यूनत्वानं भरलेल्या जगण्याची क्लिष्टता असतं

तर कधी निसर्गाविषयी कृतघ्नता असतं 

वात्सल्यानं  ममत्वाचं प्रतीक असलेलं क्षीर असतं 

तृष्णा भागविणारं अमृततुल्य नीर असतं 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Rate this content
Log in