कारण देऊन जा..
कारण देऊन जा..


कारण नव्हते काहीच भेटलीस तेव्हा
न कळवता जाण्याचे कारण देऊन जा
तुझ्या येण्याकडे लागलेले सदा डोळे
कड ओलावते जादा, कारण देऊन जा..
स्वप्नं जागवलीस रम्य किती जागेपणी
उडालेल्या निजेचे डोळस, कारण देऊन जा
वचने, शपथांची झोळी कशी उधळावी
पडलेल्या छिद्रांचे ठळक, कारण देऊन जा
गेलीस, जाणार होतीसच जर उठून डावातून
चुकलेल्या धोरणाचे ठोस, कारण देऊन जा
दुःख कसले अन् कशाचे व्यर्थ कवटाळावे मी
आठवांचे क्षण जरासे, मला तारण देऊन जा..