STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

जिजाऊ

जिजाऊ

1 min
14.7K


लखुजी म्हाळसाबाई पोटी

लेक त्या जाधव घराण्याची

होती पौष पौर्णिमा गुरुवारी

१२ जानेवारी पहाटे सहाची

आई वडीलांचे शौर्य संस्कार

अक्षर ओळख गोडी शिक्षणाची

वेरूळचे शहाजी राजे भोसले

वाजली सनई जिजाऊ लग्नाची

खंडागळे हत्ती प्रकरण

वैर दोन्ही घराण्याचे

सासर माहेर दूरावा घडे

कूटनिती अशी राजवटीची

शिवनेरी १९ फेब्रुवारी सायं वेळ

वार्ता तेजोमय पुत्र जन्माची

होईल उध्दार आता आपला

मनी होती आस स्वराज्याची

घडवीले शूर शिवाजींना

पहाट उगवली स्वराज्याची

जिजापूर वसवले प्रयत्ने

भरभराट शिव साम्राज्याची

रयतेचा राजा जिजाऊ घडवी

जोपासली प्रतिमा अस्मीतेची

सर्वत्र बोल बाला होता आणि

चर्चा ही फक्त जिजाऊ पुत्राची

मंगलमय दिन आला

घटीका राज्यभिषेकाची

अपमान व्यवस्थेने केला

जिजाऊ खचलेल्या मनाची

राज्यभिषेक १२ व्या दिवशी

पाचड गावी वेळ रात्री बाराची

प्राण ज्योत अखेर मालवली

१७ जून राजमाता जिजाऊंची


Rate this content
Log in