जीव बाळात गुंतला
जीव बाळात गुंतला
1 min
123
जरी गेले नित्य कचेरीला
ढीग नित्य पुढे असलेला
आठवण बाळा सदा येते
तुझ्यात जीव माझा गुंतला
रोजीरोटीसाठी खटाटोप
आवरुन सारे घरकाम
थेट गाठते पाळणाघर
दगड काळजावर जाम
कधी सर्दी पडसे खोकला
मामुलीच तरी जीव गोळा
दाबूनी बटण संगणका
सारखी पहाते राजसाला
दंग असतोस मस्तीमधे
चित्रे रेखाटिसी वहीमधे
रमतोस बालविश्वामधे
मग मन माझे कामामधे
सारी धावपळ आटापिटा
तुजसाठीच रे मांडलेला
शिकूनी मोठा होशील बाळा
जीव तुजठायी गुंतलेला