STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

।।झळ पाण्याची।

।।झळ पाण्याची।

1 min
26.8K


दुष्काळाची झळ आम्हाला, अजून लागली नाही।

किती लागले शोध, तरी, पाणी मात्र शोधले नाही।।

 

पाण्यासाठी अणुस्फोटाने, जमीन सारी खोदलीआहे।

रेल्वेने पाणी कोणी आणले, म्हणूनगाडी अडली आहे।।

 

कोणत्या गावातपाणी सोडायचं ते अजून ठरलं नाही।

श्रेयासाठी साऱ्यापक्षाचं, अजून एकमत झालंच नाही।।

 

पाण्यासाठी स्थानिक आणि भाडेकरू हा वाद सुरु आहे।

पण पाण्याच्या एका थेंबासाठी, रक्त कुणी सांडले आहे।।


Rate this content
Log in