STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3.7  

Abasaheb Mhaske

Others

जेंव्हा आम्ही लिहते होतो ...

जेंव्हा आम्ही लिहते होतो ...

1 min
13.8K


जेंव्हा आम्ही लिहते होतो ...

अस्वस्थ होतो अंतरबाह्य आतून ..

पोडतिडकीन काही सांगावं मनातून 

ती अंतर्मनची उस्फुर्त साद असत 

आरशासम उमटलेले पडसाद असत ..

जेंव्हा आम्ही लिहते होतो ... 

सभोवताली जे काही घडत - बिघडत 

आमच्या मनाला भावत नि खटकत 

संवेदनशील मनाचा प्रतिसाद असत

तेच सार काही लेखणीतून साकारत...

  

जेंव्हा आम्ही लिहते होतो ... 

नसतोच कुणावर आमचा रोष 

अन नसतोही कुठ्ला वैयक्तिक स्वार्थ 

केवळ जगणं त्यांचं सुकर व्हावं ...

अन सर्वांचंच भलं व्हावं... 

जेंव्हा आम्ही लिहते होतो ...

ईश्वरी इच्छा म्हणा कि तुमच्याप्रती सदिच्छा

एवढं मात्र नक्की सकल कुणाचेच हित चिंतितो 

मागन ही आमच त्या नियंत्याला तेच असत

सांभाळून घे रे सगळयांना हेही तुझीच लेकुरे..

जेंव्हा आम्ही लिहते होतो ...

रसिक जनहो! खरं सांगतो तुमच्यामुळेच

आमचे अस्तित्व आम्ही घडतो - बिघडतो ...

तुमच्या आशीर्वादाने, प्रेरणेनेच लिहत राहतो

अन तुमच्याच चरणी लीन होतो सर्वार्थाने .....  

जेंव्हा आम्ही लिहते होतो ... 

फुले शाहू आंबेडकरांचे पाईक होतो 

त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो

त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होतो

 

जेंव्हा आम्ही लिहते होतो ... 

खदखदणारा असंतोष कधी सभोवतालची न्यूनता टिपतो 

अराजक , दुःख दारिद्र्य , नैतिकतेची होणारी पायमल्ली 

हताश न होता खंबीर होण्यास उभं राहण्या प्रेरणा देतो आम्ही ...

सकारत्मकेची कास धरुनी क्रांतीची बीजेच पेरतो आम्ही 


Rate this content
Log in