जाऊ स्वप्नांच्या गावा...!
जाऊ स्वप्नांच्या गावा...!


लेखणी माझी बहुरूपी
कधी स्वप्नांनी भरलेली
कधी वास्तवांशी झुंजणार...
स्वच्छंदी मी,
शब्द, लेखणी माझी पेरते
लेखणीचे बळ माझे
स्वप्नांच्या गावातच सजते....
दिसामाजी लिहित राहावे,
आकाशीच्या चंद्रमाला
लेखणीने स्मरावे
चांदण्यात कधी कधी
स्वतःलाही पाहावे...