STORYMIRROR

Pranali Kadam

Others

4  

Pranali Kadam

Others

जाणिवांचा कप्पा कोरडा राहीला

जाणिवांचा कप्पा कोरडा राहीला

1 min
426



सगळं काही तुझ्यात होते

सगळं काही तुझ्यात होते,

माझे मीपण

कुठे राहीले होते?,

तुझ्यात होते माझे मीपण...!


जपली होतीे मी,..जपली होती मी

अबोल प्रीत माझ्या हृदयात

तरीही का कोण जाणे,

आज ते हरवले होते

जाणिवांचा एक कप्पा, कोरडा राहीला होता...


आकाश कोरडे, पाऊस कोरडा

मनही तुझे आता कोरडे झाले होते

कुठून आणणार होते,..

कुठून आणणार होते.?

मी ते ओलावलेपण !!

ज्याने तुझ्या हृद्याची भूई गंधाळणार होती

कसं मी शिंपण करणार होते?,

कारण आता सारंच कोरडे झाले होते

जाणिवांचा एक कप्पा कोरडा राहीला होता...


डोळ्यातील अश्रू

आता मूक झाले होते

जाणिवांची खोली आता रिकामी झाली होती,

तुझ्यातलं प्रेम, भावना सारंच काही

आता कोरडं झालं होतं

जगण्याला अर्थ आता उरला नव्हता...


उरल्या होत्या आता फक्त आठवणी !!

मन कोरडे, प्रीत कोरडी आणि

तो आकाशही आता, कोरडाच राहीला होता

जाणिवांचा एक कप्पा कोरडा राहीला होता....


भूई जशी पाण्याशिवाय होरपळून निघते

तशीच मीही,

तुझ्या प्रेमात होरपळत होते

तू बांध घालून परस्पर निघून गेला होता,

तिथे आता एक डबकं तयार झालं होतं

अन् मग तिथेच,..


प्रेमाचा निचरा थांबला होता

जाणिवांचा एक कप्पा कोरडा राहीला होता....

जाणिवांचा एक कप्पा कोरडा राहीला होता....


©प्रणाली कदम


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Pranali Kadam

वचन

वचन

1 min വായിക്കുക

भारत

भारत

1 min വായിക്കുക

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min വായിക്കുക

दहन

दहन

1 min വായിക്കുക

पाऊस

पाऊस

1 min വായിക്കുക