STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

हरवू नये कधीच कविता...

हरवू नये कधीच कविता...

1 min
13.8K


छंदा - बिंदाच्या फंद्यात पडून हरवू नये कधीच कविता 

तिला हुंदडू द्यावं नदीसारखं... मुक्त ,स्वछंदी , कलंदर 

तिला बसू नये कधी विशिष्ट साच्यात ,.बंधात कारण ...

बंध म्हटले की स्वातंत्र्य हिरवण्याचाच धोका जास्त 

कविता असावी आरशासारखी प्रतिबिंत होत जाणारी ...

समाजाचं चित्रण हुबहू उमटण्यासाठी तिन व्हावं प्रवाही ..

दुःख कधीही लयीत नसत ते असत ओबड -धोबड ., भावोत्कट   

तिला बागडू द्यावं निरागस ,लहानग मुलं होऊन बिनधास्त...

कविता बहरावी फुलासारखी प्रत्येकाच्या मनामनात... 

तिन दाहीदिशा व्यापून टाकाव्यात आपल्या अंगभूत गुणांनी 

तिन व्हावं कात टाकलेली नागिणीसारखं ... चैतन्यमयी ...

गावं क्रांतीच , संस्कारच , मांगल्याचं अनमोल गाणं सदोदित ...

कविता नसावीच कधी मला पहा , पानफूल वाहा सारखी दिखाऊ 

ती असावी आशयघन , प्रसाद , ओज , माधुर्य जपणारी ...पण 

ती नसावीच कुणाची गुलाम , नाहक बदनाम ,कुचकामी ठरणारी 

ती असावी इतकी सहज ,सुलभ, अर्थवाही  ,रसिक मनावर अधिराज्य गाजवणारी ... 


Rate this content
Log in