हलवायाचे दुकान
हलवायाचे दुकान
हलवायाच्या दुकानात
पदार्थ किती
बघून सारे
बदलते नीति
ढोकळा, कचोरी
समोसा, बाकरवडी
पेढे, बर्फी
जिलेबी, रबडी
हे घेऊ
का ते
घ्यावे सारे
मनी वाटते
कधीही पदार्थ
मिळतात बाजारात
पाहिजे तेव्हा
टाकायचे तोंडात
कष्ट सारे
कमी होई
हलवायाचे दुकान
हमी देई