ही वाट...
ही वाट...

1 min

11.6K
कुणी पाहिलंय, ही वाट जाते कुठे?
रस्त्याला चोरून रोज भेटतेय कुठे
इवलीशी ही वाट तीला किती फाटे
चालला किती तरी वाट संपतेय कुठे?
कधी फुलांचा सडा वाटेवर कधी काटे
जो जसा त्याला वाटही तशीच वाटे.
रुळलेल्या वाटेवर सगळेच चालतात कुठे
रोज नवे संकट मग नव्या वाटेवर भेटे.
वाट देत नाही कधीच अंदाज जायचे कुठे
ध्येय ज्याच्या समोर त्याची वाट यश गाठे.
नवी वाट शोधावी कधीतरी मनाला वाटे
तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे.