STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

0.2  

Abasaheb Mhaske

Others

गुरुजी !

गुरुजी !

1 min
3.9K


गुरुजी ! बाळ माझं जणू चिखलाचा गोळा ...

अन तुम्ही आहात आकार देणारे कुंभार दादा

गुरुजी ! विसरून नका कधीच तुमची जबाबदारी

तुम्हीच त्याचे तारणहार नि भाग्यविधाते ..


गुरुजी तुमच्या स्वाधीन केलाय

मी माझ्या काळजाचा तुकडा

फक्त जीवन जगण्याची कला ...

गुरुजी तुम्ही शिकवा त्याला


गुरुजी तुम्ही चांगला माणूस घडवा त्याला

तुम्ही बनवू नका त्याला शर्यतीचा घोडा

भलेही तो डॉक्टर इंन्जिनीयर होणार नाही

पण भारताचा एक सुजाण नागरिक बनवा त्याला


गुरुजी ! तुम्हीच भावी पिढी घडवणार निश्चित

दुःखद प्रसंगी खंबीर होण्यास शिकवा त्याला

माणुसकीची नाती जोडण्याची कला अवगत करा

गुरुजी तुम्ही शिकवा त्याला विनयशीलता , विनम्रता


गुरुजी ! माझ्या बाळाला शिकवा आपुलकी , जिव्हाळा..

आयुष्याची गोळाबेरीज करताना प्रेमाचा गुणाकार

गुरुजी ! हमखास शिकवा त्याला नीतिमत्तेचा धडा ...

राग , द्वेष ,वजाबाकी करुन ,माणसं जोडणे शिकवा त्याला


गुरुजी ! विश्वास आहे माझा तुमच्या कर्त्तृत्वावर

पण त्याला शिकवा राजकारणातून समाजकारण

आयुष्याच्या अवघड वाटेवर तो कधीच न डगमगावा

घडवा त्याला जसा जिजाऊने शिवबा घडविला


Rate this content
Log in