गुलाम
गुलाम


कंपनीच्या साहेबांना म्हणतात मालक
तेच असतात कामगारांचे खरे पालक
कामगार असतो शेवटी एक नोकर
ठोकतो सलाम कुटूंबासाठी मिळवायला भाकर
मालकाला वाटते असावी होतकरू लोकांची वर्दी
नको नुसते वेळ घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी
असतात पाळायचे सर्वांनी कायदे
मोडले नियम तर होत नाहीत कोणाचेच फायदे
साहेब आणि कामगारांचे बनलं अतूट नातं
तर आपोआपच भरत जातं कंपनीचं बचत खातं
मिळाला बोनस की कामगार होतो खुष
हे सगळं करता करता मालकाला होतं हुश्श
काम करताना बदलली नीती
तर नोकरी जाणार ही असते कुठेतरी भीती
चांगल्या कामाची हवी असते कौतुकाची थाप
काम बिघडले तर उडतो साहेबांसमोर थरकाप
सगळीकडे संधीसाधूंचे असते राजकारण
प्रामाणिकांचे उगीच होते मधल्यामध्ये मरण
बढती मिळवण्याची सगळ्यांनाच असते हाव
मालकच ठरवतो कोणास द्यायचा वाव
होत असले कंपनीत जरी त्याचे शोषण
गप्प राहतो डोक्यात असते फक्त कुटुंबाचे पोषण