STORYMIRROR

kishor zote

Others

3.5  

kishor zote

Others

गुड गर्ल म्हणते

गुड गर्ल म्हणते

1 min
536


आई बाबा माझे 

स्कुलला जाते

आजी सोबत माझ्या

मी एकटीच राहते....


गरम गरम पाण्याने

आजी आंघोळ घालते

तीच्या साडीच्या पदराने

केस माझे कोरडे करते...


'' नवरी बाई माझी, ग ! "

मला टॉवेल गुंडाळते

खांदयावर घेऊन मग

मला झोपी घालते...


हाक ऐकताच माझी

आजी जवळ मला घेते

दूध , वरण - भाता , चप्पा

चिऊ काऊचा घास भरवते...


ऐकले नाही जर आजीचे

तर , " एक बॅड गर्ल आहे ", म्हणते

गळ्यात पडून " सॉरी ", म्हटले की

पापे घेत माझे मला, " गुड गर्ल म्हणते.... "



Rate this content
Log in