गर्व एवढा नसावा (अष्टाक्षरी)
गर्व एवढा नसावा (अष्टाक्षरी)
दोन शब्द प्रेमभावे
त्यात असावा गोडवा
कटू शब्दाने कशाला
तेढ मनात वाढावा? ॥१॥
जात मानवाची एक
भेदभाव मिटवावा
दरी गरीब श्रीमंत
सेतू आपण जोडावा ॥२॥
रुप परमेश्वराचे
चराचर शोध घ्यावा
जीव सजीव सगळे
हक्क प्रत्येका मिळावा ॥३॥
मन शांती साठी सदा
सकारात्मकता ठेवा
तीच ऊर्जा आपणास
तुम्ही स्थैर्यासाठी लावा ॥४॥
मीच माझा मोठेपणा
असा कशाला सांगावा
करा दुसऱ्यास मोठे
जपा आदर्शाचा ठेवा ॥५॥
उगा फुका अहंकार
मनी कशा बाळगावा ?
अरे मानवा ऐक ना
गर्व एवढा नसावा ! ॥६॥