गरीबी
गरीबी
1 min
28.4K
गरीबी घरची
कुणाला सांगावी
झोळीत बहिण
बांधुनी घेतली.....१
मोठा भाऊ तीचा
आझे खांदयावरी
निजली निवांत
खंत काही नाही.....२
शिक्षण आमचे
दूर आहे किती?
बालपणीच ही
जबाबदारी किती?....३
आई बाबा आम्हा
भीक मागावती
आमची कमाईत
घर चालविती.....४
