गोगलगाय ( सहाक्षरी )
गोगलगाय ( सहाक्षरी )
1 min
28.7K
गोगलगाय
( सहाक्षरी )
इवलासा जीव
गोगलगाय ती
हळुवार सारे
करी ना घाई ती .....१
गुळगुळीत ते
मऊ अंग तीचे
पाठीवर पहा
असे घर तीचे.....२
सकाळी सकाळी
पानावर चाले
आपले ते तोंड
फुलात हो घाले....३
नाकात शिरले
तिच्या काही तरी
शिंकत शिंकत
फिरे ती माघारी....४
