गणेश आरती
गणेश आरती
जयदेवा जयदेवा, जय गजानना
आरती ओवाळू, प्रसन्न वदना
मुख मनोहर, तेज झळाळते
मुकुटामधूनी, रत्न प्रभा झळकते
मूषक वाहन, प्रिय गजानना (1)
विद्या नि कलांचा, अधिपती राज
भक्त अंगावरी, घालिती रे साज
मोदक चवीचे, द्या विनायकांना (2)
विघ्नहर्ता करी, रक्षण भक्तांचे
आले संकटचि, दुर्धर रोगाचे
तारिसी आम्हांला, रक्षावे भक्तांना (3)