STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

घरी येणं...!

घरी येणं...!

1 min
872


मनी असे ते स्वप्नी दिसे

सरळ साधे जीवन असे

हवे हवे ते सारे वसे

हे घडते असे कसे ?


येणे जाणे होत होते

अप्रूप त्याचे वाटत नव्हते

वाट पाहणे होत होते

तस वेगळं घडत नव्हते....


पण आज वेगळंच झालं

तुझं येणं अचानक झालं

जणू डोळ्याचं पारणं फिटलं

अग घर माझं क्षणात भरल...


लक्ष्मीच येण काय असत

ते मला जाणवलं

येऊन घरी माझ्या

डोळ्यांना तू पाणावल...


हृदय माझं हेलावल

अंतरण भरून आलं

जीवन सार कस

सौख्यात भिजून चिंब झालं....!


Rate this content
Log in