STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

घड्याळ

घड्याळ

1 min
11.9K

घड्याळाची टिकटिक....

सतत चालू असणारी......

कधीही बघा , सतत पुढे पळणारी......

बाजूच्या सुखदुःखांची पर्वा 

नसते......

त्याची गती एकसारखीच असते......

सुखात पळत नाही....

दुःखात थांबत नाही.....

सतत चालत रहाणे , एवढेच 

त्याला माहित.....

कारण काट्यांचे एकमेकांशी

जुळत जाते गणित......

अडवणार कोण मला?.....

हाच त्याचा बाणा......

मागे घ्यावे , पुढे न्यावे.....

बळ नसे कुणा.......

त्यालाच माहित नसते....

अविरत किती चालायचे?

विधात्याच्या हाती.....

सूत्र असे चावीचे.......

चावी संपताच......

बंद जिथल्यातिथे......

विधात्याची इच्छा.......

कोण अडवू शके.........


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract