STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

गड्या तू शेतकरी

गड्या तू शेतकरी

1 min
27.2K


गड्या तू शेतकरी , कष्टकरी म्हणून जन्मास आलास ...

हाच काय तो तुझा गुन्हा ...तुझ्या नशिबी दुःख दारिद्र्यच 

का म्हणून ? थकलो उत्तर शोधून पुनः पुन्हा...

तू जगलास ,मेलास फरक पडणार का कुणा ?

तुझं जीवन म्हणजे जणू टिंगल - टवाळी 

कर्जाचा डोंगर, अखंड तुझ्याच भाळी ..

बळीराजा , जगाचा पोशिंदा म्हणून...

टर उडविली त्यांनीच पिढ्यान पिढ्या ...

तुझ्या मालाला भाव नाही , ना अजिबात तुला 

मातीत राबून कित्येक पिढ्या बरबाद झाल्या ...

कुठवर सोसणार अन्याय ? कोण त्यांना जाब विचारणार ? 

खाणारे तेच अन गाणारेही तेच, हाच खरा पेच  

कुंपणानेच शेत खाल्लें दाद मागावी कोणाकडे ?

हे काय अन ते काय , एकाच माळेचे मणी ...

तू बिचारा अडली गाय.. अन काटे खाय 

दगडापेक्षा वीट मऊ , आणखी दुसरे काय ?

निसर्गाने साथ सोडली तशी नशिबानेही ...

आम्हीच दिली चावी स्वखुशीने चोरांच्या हाती ...

आता काय बघत बसावे चॅनलवर तमाशा ...

तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं ....


Rate this content
Log in