गावाकडचे खेळ ( अष्टाक्षरी )
गावाकडचे खेळ ( अष्टाक्षरी )
1 min
14.6K
खेळ गावाकडचे ते
आठवता मन धावे
गावा मामाच्या आपल्या
सुट्टया लागताच जावे
टायरला मारायची
काडी जोरात जोरात
गावा फेरा मारायचा
गोल गोल चकरात
डबा एैस पैस असा
पहा तेंव्हा रंगायचा
डब्बा उडवता कोणी
राज आपला जायचा
लपा छपी खेळताना
दहा वीस म्हणायचे
भिंतीकडे तोंड आणि
हात डोळा झाकायचे
माती गावाची रोडला
झाली आता एकरूप
गेम मोबाईल आले
खेळ पालटले रूप
