गारव्यातला पावसाळा
गारव्यातला पावसाळा
अंगावर शहारे येऊन आता
मस्त गारवा जाणवत होता
गरम गरम भजी समोर अन
हातात उकळलेला चाय होता
एक घास भजीचा आणि
एक घोट चहाचा घेत होतो
कानाला बांधली मखमल अन
समोर पेटवत शेकोटी होतो
झोंबत होता गारवा अंगाला
अंगावर मी घोंगडी ओढली
शेकोटीला लागतील म्हणून
भर सकाळी लाकड फोडली
शेकोटीसाठी केलेले कष्ट माझे
सगळे पाण्यात भिजून गेले
गारठ्यातील पावसाने आमचे
झोंबलेले अंग ओलेचिंब केले
भयानक वादळ येण्याची आता
शक्यता जाणू लागली आहे
मुसळधार पावसासोबत आता
गार गार वारे वाहू लागले आहे
समुद्रात सुध्दा भरती येईल
उंच उंच लाटा घेत खवळेल
गारव्याचा आनंद घेत होतो
ऋतू आम्हालाच दोषी ठरवेल
मुंबईच्या त्या किनारपट्टीवर
चक्रीवादळ धडकले वाटते
गारठ्यात आलेल्या पाऊस पाहून
सगळ्यांनाच अस्वस्थ वाटते
