STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

गाडून घ्यावे लागते

गाडून घ्यावे लागते

1 min
644


पुन्हा नव्याने अंकुरण्या

खोल असे गाडून घ्यायचे

पालवी फुटण्यास बीजा

मातीत त्या मग रुजायचे.....


शेतकऱ्याच्या मशागतीला

थबकले थेंब या कस्तुरीचे

गंधीत होण्यासाठी मातीला

भाग्य समजतो ललाटाचे.....


तहान भूक हरवतेय पहा

रानात राब राब राबायचे

डोलणारे पिक सोबतीला

स्वप्न सत्यात उतरी उदयाचे.....


भार सोशी खांदी सारा

उपकार त्या पोशिंदयाचे

तेच डोकावून कसे पाहा

इवलेशे श्वास त्या पानाचे.....


बीजा आणि विचारांना

खतपानी सदा द्यायचे

करूच नका हो स्वहत्या

हेच मनी आता ठासायचे.....


Rate this content
Log in