एकांत
एकांत
1 min
30.6K
नको मज जीवघेणा हा एकांत
कसा घालवू वेळ असे ही भ्रांत.
मज एकटीला इथे ठेऊनिया
गेला दूर साथीदार निघुनिया.
बळ आले पंखात उडाली भूर
दिसे ना कुठेच मुले गेली दूर.
छळतात मज आठवणी तुझ्या
अश्रू आटले खोल नयनी माझ्या.
कसा घालवू एकांत प्रश्न वाटे
अशा या क्षणांचे बोचतात काटे.
एकटेपणाचा एकांत नकोसा
आज मृत्यू मज वाटतो हवासा.
