STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

एक भोळे स्वप्न माझे

एक भोळे स्वप्न माझे

1 min
179

हातात या हिरवा चुडा मेंदी ही रंगेल का?

एक भोळे स्वप्न माझे पूर्ण ते होईल का?


ओढणी ही खेचतो मस्करी वारा करी

पदर माझ्या पैठणीचा 'तो' असा ओढील का? ..1..


मिटून घेता पापण्या डोळा दिसे मज तोच तो

रात्रीची माझी सुखाची झोप तो मोडील का? ..2..


वेडी म्हणा, समजा खुळी, मोगऱ्याची मी कळी

या फुलाचा गंध दरवळ आयुष्यही बहरेल का? ..3..


नेईल तो जेथे मला जाईन त्याच्या संगती

पालखी आणून दारी तो मला नेईल का? ..4..


होईन त्याची स्वामिनी, तोच माझा घर धनी

आस माझी सानुली ही तोच ती पुरवेल का? ..5..


हेच माझे स्वप्न भोळे, सांगू कसे कोणा कधी

गीत माझ्या जीवनाचे तो कधी गाईल का? ..6..


अधीर मी झाले मनी सौभाग्य कुंकू लावण्या

केव्हाच त्याची जाहले, माझाच तो होईल का? ..7..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance