दवबिंदू
दवबिंदू
1 min
3.2K
दवबिंदू
गर्द हिरव्या पानावरी
पडे दवबिंदूंचा सडा
मोती चमकतो जसा
सृष्टी सोहळा केवढा।
रोप तरारून उठे
दव विसावे पानात
कृपा सृष्टी देवतेची
चैतन्याचा जलस्त्रोत।
थेंब पाण्याचा तेजस्वी
घाली पाहता भूरळ
एका किरण स्पर्शाने
लुप्त वाफेमध्ये जल।
जीवनाचे प्रतिरूप
समजावी हा निसर्ग
क्षणातच लोपणार
कर्म करण्यात स्वर्ग।
क्षणिकच का असेना
व्हावी कृपा दवापरी
कर स्पर्श जीवनाला
होण्या तुळस मंजिरी।