दूरध्वनी (सहाक्षरी)
दूरध्वनी (सहाक्षरी)

1 min

2.8K
जुना असो नवा
फोन होता हवा
रिंग ती वाजता
आनंद तो व्हावा
दूरध्वनी यंत्र
शोध तो लागता
बोलणे सुकर
साऱ्यांचे करता
पत्राचा प्रपंच
संपलाच सारा
स्मार्टफोन हाती
तंत्रज्ञान धरा
गुलामच झालो
नकळत सारे
नात्यातच वाहे
दूराव्याचे वारे