धुंद हवा
धुंद हवा
1 min
42
(अष्टाक्षरी रचना)
सांजवेळी साद घाले
मनातील भाव फुले
धुंद हवेतील गंध
पाहुनिया तन झुले ।।
धुंद हवा स्पर्शुनिया
मम काया शहारली
हुरहूर वाटे जीवा
लाजुनिया बावरली ।।
निशाराणी खुणावते
गाते प्रीतीचा मारवा
मिट्ट काळोखात सखी
लपे मिठीत चांदवा ।।
धुंद हवा चहूकडे
धुके दाटले क्षणात
भाव नाचरे बिलोरे
ओढ बेबंद श्वासात ।।