धरित्री
धरित्री

1 min

49
शामल मेघे .. नभ हे भरले
चाहुल लागे .. पर्जन्याची
थेंबाथेंबात .. धरा भिजली
मन मयुरा .. ओढ पावसाची..
मनही भिजले .. तनही भिजले
आस मनाला .. तव मिठीची
नेत्र लागले .. तव वाटेवर
चाहुल घेते .. पायरवाची ..
धुंद करी .. पाऊस मनाला
अशीच अवस्था .. धरित्रीची
बेचैन मन .. आतुर जाहली
ही तर चाहुल .. तारूण्याची ..