धन
धन

1 min

46
कुंकू माझं सौभाग्य
प्रतीक हे विश्वासाचे
प्रेम लाभो नात्याला
सार्थक हेच जीवनाचे
भाळी लाल टिळा शोभे
एकवटतो शक्ती मस्तकी
रंग माहात्म्य त्याचे खरे
फिके सारे काही बाकी
साज न्यारा सजतो
शृंगार रंगींरंग रंगतो
आरसा न्याहाळतो
बोट काजळाचे लावतो
फुलावा संसार माझा
कुंकू सोबती आजीवन
सखा माझा प्रेमळ
मनकवडा जिंकतो मन