STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

धीर

धीर

1 min
169

तुझ्या प्रेमात झालो मी गुन्हेगार 

लागली फाशी तू थोडा दे धीर....


पसंद नां मला आकाशातली परी 

लाखात एक तू सगळ्यात भारी 

तूझी अदा अशी कमानीतला तीर....


नजर तूझी राणी जशी तलवार 

जाईल जीव मिळेना साक्षीदार 

खाऊ दे मला तुझ्या प्रेमात खीर....


तुझे तिखट बोल जशी बंदूक 

उघड मनातल्या प्रेमाचा संदूक 

सांग तुझ्यासाठी हारले किती वीर....


खतरनाक तुझ्या प्रेमाचं जाळं 

तुझ जीवन प्रेमात होईल काळं 

तुझ्या प्रेमाची तहान पाज मला नीर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance