।।देव।।
।।देव।।
1 min
3.6K
शिर्डी चा साई भक्तांच्या दारी
देवपण विसरुनी करितो चाकरी।।धृ।।
देव नाही मंदिरी वसे मना अंतरी
मन मनाI वैरी तनाला सावरी
फिरुनी दारोदारी दैवा हाक मारी
देवपण विसरुनी करितो चाकरी।।१।।
क्षणांचा आभास कणांचा विलास
क्षणात होई ऱ्हास कायमचा उदास
गेला क्षण उभारी जीवाला तारी
देवपण विसरुनी करितो चाकरी।।२।।
वासनांचा अंधार फिरवी दारोदार
नाही रे आधार चरणी तुझ्या लाचार
घेई खांद्यावरी भक्तांचा मुरारी
देवपण विसरुनी करितो चाकरी।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
ज
