देव भाव भुकेला
देव भाव भुकेला
1 min
162
भक्तीभावे वारकरी
वारकरी वारीमधे
भेटीलागी पांडुरंग
पांडुरंग मनामधे
भक्तीमार्गे वारकरी
वारकरी भजनात
धुंद टाळ्या अभंगात
अभंगात गजरात
अश्व धावे रिंगणात
रिंगणात गजरात
वारकरी नाचतात
नाचतात आनंदात
भावभोळा भक्तिभाव
भक्तीभावा भुकेलेला
श्रद्धा मनी जाणूनीया
जाणूनीया तोषलेला
मेळा नाचे आषाढीला
आषाढीला वाळवंटी
उराउरी घेती भेट
भेट होता सुखावती
