देऊन दाद..!
देऊन दाद..!
1 min
250
...श्वास-श्वास खोटा इथे,
देती दिलासे सोडूनी..
दिन कसेही लोटती,
सूर्योदय फेटाळूनी..! १.
नित्य जाळणारे प्रश्न,
कसे क्षणात मिटले !
अन निजधामाशी मी,
होते खुशाल हसले..! २.
आले हरेक सांत्वनी,
असोशित भेटायाला..
गंध लपेटले स्वार्थी,
होते सारे हेरायाला..! ३.
अता उधाण येईल,
ऐन वेळी आरतीला..
कोणी मनात बोलेल,
मन मोकळे व्हायला..! ४.
इथे मीच ठेवताहे,
अनुभव सर्व प्यारे..
होते खरीच महान,
हुंदक्यात...गहिवरे..! ५.
..अन् बळे बळेच हा,
गळा कोणाचा फाटला!
मंच होता रंगीन हा,
दाद.. मीच.. द्यावयाला..! ६.