डोळ्याचे अभंग
डोळ्याचे अभंग


डोळे हे सुंदर । चेहऱ्याचे सौंदर्य ।
सृष्टीचे सौंदर्य । डोळे पाही ॥
डोळे मटकले । अर्थाचे अनर्थ ।
डोळ्यातून आपुले । भाव स्पष्ट होई ॥
संवेदनाचे पाझर । डोळ्याच्या कोपऱ्यात ।
डोळे निरागस । ओसंडून वाहती ।।
खुशी किंवा राग । चमकतात डोळे ।
समजून घे तू । निरखूनी पाही ।|
शब्द जे अपुरे । तुझे ते करिती ।
भावनेत दडले । मनावर माया करिती ॥
तलवारीच्या सम । डोळे घाव करिती ।
डोळे मोत्यासमे । अश्रू ओघळती ॥
डोळे कमलनयनी । स्वप्नात दंगलेले ।
प्रेमाच्या रंगात । मन करते नशिले ॥