चला जाऊ या पुढे
चला जाऊ या पुढे


अंधारातून चला जाऊ
या आपण तेजाकडे.
गुंफुनी हाती हात चला,
चला जाऊ या. पुढे !
रणात हतबल एकल पार्था.
श्रीहरी ने सांगितली गीता.
करून रिकामा आपला भाता.
पाच तुम्ही शत कौरव ते.
नको झुकू रे शत्रू पुढे. (१).
छत्रपती श्री शिवरायांनी.
एकजुटीचा मंत्र सागुंनी.
गड,किल्ले घेतले जिंकुनी.
संघटित मावळे करोनी.
पै जेचे उचलले विडे (२).
चार हात ते जेव्हा जुळती.
सामर्थ्याने कामे करती.
दूर राहुनी "मिळवू हात".
एक साथी ने घालवू 'साथ.
सहस्त्र किरणे नभी पसरता.
तीमिर सागरी बुडे (३).
महान बल ह्या एकजुटीचे.
नकोत आता भांडण तंटे.
एकदिलाने एकजुटीने.
होती कामे जलद गतीने
संघ शक्तीने जादू घडे (४).