STORYMIRROR

Pranali Kadam

Others

3  

Pranali Kadam

Others

चक्रव्यूह

चक्रव्यूह

1 min
28K


आयुष्याच्या चक्रव्यूह मध्ये

माणूस अडकत जातो

जिवन मरणाचा खेळ

सतत इथे चालत असतो....

कोण बरोबर कोण चूक

कोणी नसतो सभ्य इथे

चालतो बाजार सगळीकडे

मनाचा लिलाव चालतो जिथे तिथे....

मनाच्या भावाचे मुल्यापण

देवाला तरी कुठे चुकले

मानवरूपी जन्म घेवून

त्याला कुठे प्रेम मिळाले.....

त्यानेच घडवली ही सृष्टी

आणि स्वत: त्यात अडकला

चक्रव्यूह रचणारा विधाता

जाळ्यात स्वत: होता फसला...

मानव हा स्वप्नरूपी प्राणी

मोहजाल मध्ये राहतो न् रमतो

विसर पडतो आपल्या कर्माचा

हुंडाबळी,अत्याच्यार करत राहतो...

शापित तो मानवी जीवन

कधी नसते सुटका त्याची

सतत चक्रव्यूह मध्ये होरपळत

जळून जाते काया त्याची...


Rate this content
Log in