चिन्ह
चिन्ह
1 min
13.4K
चिन्ह
असतात शब्दामधलं
विश्रांती स्थळ
भावना अभिव्यक्त करणारे ...
.
चिन्ह
असतात शब्दांचे
विश्वासू सहकारी
सदैव मैत्री निभावणारे ...
चिन्ह
असतात शब्दाप्रती
समर्पित , अविचल
दोन्हीमधला दुवा ठरणारे ...
चिन्ह
असतात शब्दामधलं स्पीडब्रेकर
कुठं थांबावं, किती थांबावं
सदैव मार्गदर्शक ठरणारे ...
चिन्ह
असतात जोकर
शब्दाचे सहायक
सदैव मैत्री निभावणारे ...
चिन्ह
असतात रागीट
प्रेमळ ,सहजसुलभ , हळवे
तर कधी प्रश्नांकित होत जाणारे ....
