छकुलीचे स्वप्न
छकुलीचे स्वप्न

1 min

38
काव्यप्रकार अष्टाक्षरी
छोटी छकुली दमली
पटकन झोपी गेली
बनातली फुलराणी
हलकेच स्वप्नी आली (1)
गोड तिची हास्यमुद्रा
हात घेतला हातात
छकुलीला हर्ष मनी
कळी खुलली मनात (2)
फुलराणी नेई तिला
गोड फुलांच्या बनात
रंग गंधाने भरला
दरवळ मानसात (3)
लाल गुलाबी पिवळी
फुले गुलाबाची बनी
चाफा मोगरा चमेली
रातराणी जाई जुई (4)
फुलराणी फूल देई
घेई छकुली हातात
ओठांवर हसू येई
रमे स्वप्न जगतात (5)