चहा
चहा
1 min
1.1K
चहा
चिनी सम्राट शेन नुंग
देण आहे पाहा त्याची
लागली असे सान थोर
तीच ही तल्लफ चहाची....१
इंग्रज गव्हर्नर जनरल
लॉर्ड बॅटिक भेट आसामची
चहाचे मळे फुलवत लावली
भारतीयांना चटक चहाची.....२
सकाळ, दुपार , संध्याकाळ
होत असे ओढ पिण्याची
चौका चौकात वाफाळत
टपरी असे उभी चहाची.....३
चाय पे चर्चा होत होत
चढे रंगत राजकारणाची
चहावालाही म्हणे मग
धुरा सांभाळतो प्रधानमंत्र्याची....४
चहाचे प्रकार नव नवे
सर नाही बायकोची
वाफाळलेला चहा देत
सुरवात करते दिवसाची.....५
