Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

काव्य रजनी

Others

4.0  

काव्य रजनी

Others

चहा बिस्कीट

चहा बिस्कीट

2 mins
11.6K


आत्ताच प्यायले बाई मी चहा

नव्हे फक्त चहा जोडीला बिस्कीट 

गरम गरम केला कडक

आले, लवंग आणि मिरी बेधडक


कसले ते लवंग भारीच चव

काय सांगू त्या मिरीचा स्वाद

साखरेची ती सुरी दुधारी

आले मध्येच नाचे मन मुराद


चहाशिवाय दिस तरी आहे का

लोक का म्हणतात चहा वाईट

अहो चहाशिवाय आहे का 

बिस्कीटचा एक तरी बाईट्ट


चहा सोबतीला बिस्कीट हवे

ट्रे मध्येच सारे सजून यावे

जशी नववधू पाहण्यास 

पाहुणे सारे घरी हवे


गावच्या चहाची बातच न्यारी

गवती चहा करी मन हे भारी

बिस्किटे सोबती येतात सारी

गणगोत सारे त्यावर ताव मारी


कशी अजब अशी एकमेव जोडी

सगळ्या सुख-दुःखात सहभागी

कधी हसणे कधी रडणे, भांडणे

कितीही झाले तरी ती मध्यभागी


चहा-बिस्किटे खाल्ली जेव्हा

प्रत्येकामध्ये आली तरतरी

लहान मुलांना खेळण्या मग

लगेच पटकन येई भरारी


कितीही कामे विस्कटलेली

चहा-बिस्किटे पूर्ण करी

कधी ऑफिसचे टेन्शन

चहाची वाफ त्यांस सावरी


अशी ही चहा-बिस्कीट जोडी

सदा बहरत जावो प्रतिदिन

कधीच न त्याचा लोप पावो

असेच सोबत असो रात्रंदिन..


माझ्या आईच्या चहाची

खूप गंमत हो न्यारी

भांडती आम्ही भावंडे

चहासाठी सारी


चहा कसाही असो

कोरा अन् पांढरा

सूर्याची किरणे ती पडता

दिस उजाडतो खरा


नवरा-बायकोच्या 

नात्याला चहाची हो मजा 

कितीही भांडणे झाली

अबोला ही सजा


मला चहा पिला

की येते हो तरतरी

गुळाचा की साखरेचा

त्यात नाही हो तस्करी


पावसाळ्यात छत्रीत

बसून घेतला का चहा

आभाळ कवेत येते

प्रयोग करून पाहा


थंडगार हवा

त्यात कडक तो चहा

मज वाटे ढगांमध्ये

चला जाऊन ते पाहा


सासू-सून दिवसभर

किती भांडणे करे

शेवटी चहाच्या कपात

भांडणे मिटती हे खरे

अहो अहो चहा घेता

असे पुसते हो पत्नी

पतिदेव स्मितहास्य

करी छान स्वप्नी


निळ्याभोर आभाळात

पाखरांचा थवा

चहाचा रंग हो कसा

वाटतो हवा हवा

चहा पिऊ जाऊ चला 

मोकळ्या हवेत

स्वार्थाचा नाश करू

सत्य घेऊ कवेत


माझ्या कविता नि लेख

आहे माझ्यासाठी

चहाच्या कपाने त्यांना

बांधले हो पाठी 


चहाची चव कधी

चाखून ती बघा

अंग कसे मोहरते

भरुनी मन जगा


चहा कुणास आवडे

पडले कधी प्रश्न

लहान मुले अन् म्हातारी

माणसे होती तृष्णा


अगं ऐकतीस का

चहा कसा तो होईना

पती राजांना जरा

कळही सोसविना


असा कसा चहा

कधी कधी रे रुसतो

सारे जिन्नस टाकले

पहुण्यामध्ये फसतो


तुझ्या माझ्या चहाची

बातच रे न्यारी

करती निखळ मैत्री

गोड गोड प्यारी


पावसाळा जेव्हा आला

चहा मज उमगला

सप्तरंगच्या इंद्रधनुष्य

कसा तो सजला


माझ्या मनात अबोल भाव

चहाचे ते माझे घर

अनमोल माझा बाळ त्यात

त्याला लागो ना कुणाची नजर

चहा पीत पित

होते सारे दुःख ठीक

शेतकरी कष्ट करे 

तेव्हा डुलत रे पीक

तेव्हा फुलते रे पीक...


Rate this content
Log in