STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

चाफा दरवळला...

चाफा दरवळला...

1 min
395

सुवर्णचंपक वनातला, मोहरला, दरवळला....

नागचाफा डोलतो बासरीच्या धुनेवर झुलतो...

देव चाफा पाच पाकळ्यांचा दिमाखात उभा देवळासमोरचा..

खुर चाफा रात्रीस उमलतो,सौम्य परिमळ पतंगास आमंत्रित करतो...

पिवळा चाफा, सुंदर, सोनेरी लवाचा अत्तरात, सजावटीत, तेलात, वापरायचा...

कवठी चाफा महापुष्प खास पाहता खग बसल्याचा होतो भास...

हिरवा चाफा सुवासिक भारी, सुगंधाने मोहून येती सर्प विषारी...

भुईचाफा भुईसरपट आकर्षक, बागेची शोभा वाढे, वाटे मनमोहक...

कनक चाफा, दंतुर फुले वसंतात, काळी फळे याची डोळ्यांसारखी दिसतात...

अनेक जाती, अनेक रंग, पसरतो, विविधेत एकतेचा माझ्या देशासम संदेश स्मरतो!


साहित्याला गुण द्या
लॉग इन