STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

चालू द्या ...

चालू द्या ...

1 min
14.2K


तुम्ही तळताय खुशाल मनातच गुलगुले 

फेस ना पाणी नुसतेच हवेत बुडबुडे सारे  

कुठवर पुरणार तुम्हाला जातीयतेचे भांडवल 

सरड्याची धाव कुंपणापर्यंत ...

थापाडे तुम्ही एकापेक्षा एक सरस 

तुमच्या दुकानात काहीच मिळत नाही 

तरीही तुम्ही सुखी माणसाचा सदर विकता  

पापाचा घडा भरतो म्हणतात ना मग अजून किती भरता  

विरोधकांच्या नावाने किती दिवस खडे फोडणार ?

कर्तव्य शून्य तरी मानधन मात्र चौपट घेणार 

सामान्यजनांचं जीवन करून भकास 

खोटाच दाखवताय चॅनलवर विकास 

मागाल त्याला शेततळे 

मागाल त्याला घरकुल 

झाली आता कर्जमाफी 

चालू द्या तुमचीच नौटंकी 

मारता नुसत्याच विकासाच्या गप्पा  

भरला मुर्खांच्या बाजार नुसता  

अन्न , वस्त्र, निवार्याचा नाही पत्ता 

आणि होणार म्हणे महासत्ता


Rate this content
Log in