चाकोरीस सोडावेस
चाकोरीस सोडावेस
1 min
182
घरातील तूच कर्ती
सांभाळुनी सर्वां घेसी
दिन-रात घरासाठी
त्यात आनंद मानसी (१)
सर्वां सर्वतोपरीने
मिळवुन देसी सारे
त्याग सुखाचा करुनी
कष्ट उचलते भारे (२)
कोणी कधी सांग तुझा
मनी विचार केला का?
तुझ्या सुखासाठी कुणी
तडजोड सोसली का? (३)
मागे सदाच राहूनी
दुःख मनी दाबलेस
घालमेल अंतरात
सखे तूच सोसलीस (४)
कडकड तडतड
तुझी मला साहवेना
फडफड चाकोरीत
तुझी मला बघवेना (५)
घनापरि गडगड
सखे आता करावीस
आयुष्याच्या चाकोरीस
सखे झणी सोडावेस (६)