चाहूल
चाहूल


तुझी चाहुल लागते
जीव कासावीस होतो
सायंकाळ ती बोचते
तुला बिलगू पाहते...
मन होईल बावरे
तुला कशाची रे भीती
मनी चाहुल लागता
मन अंतरंग होई
अशी चाहुल सखा तो
माझ्या स्वप्नात येई
गोड आवाज देऊन
सारे भ्रम दूर करी...
असे गोंडस ते बाळ
तान्हे लेकरू घेऊन
माय उभी हो शेतात
चाहुल पिकाची घेऊन...
सखी कुणाची करते
जीव ओवाळून प्रेम
शब्द अपुरे ते होतात
तिच्या खऱ्या डोळ्यातून...
जशी चातकाला पावसाळ्यात
पावसाची चाहुल
बरसणाऱ्या मेघांनो
करा गडगडाटांचा माहोल
रातराणी पांघरली
वेडे गुंतले हो मन
काट्यातले गुलाब पुष्प
देते प्रेमाची चाहुल...
राधा कृष्णाची चाहुल
कृष्णा मिरेची साधना
प्रेम काय तीच जाणे
जिला कृष्ण ना भेटला...
मन पाखरू का होई
आसमंत हो निरभ्र
येता चाहुल धन्याची
लागतो मनी काहूर
ऊन-सावलीचा खेळ
होईल चालू मनामध्ये
जाई कुठवर मन
शोधू कशी रे मी कुठे...
मनाला हसून चाहुल लागते कुणाची
कुणा तान्ह्या वासराला आई मिळते हो त्याची
जिची माया
त्याच्यासाठी
साऱ्या आयुष्याला तारी...
सांग सखे नको ठेऊ
मनामध्ये संकोच
चाहुल तुझ्या मनाची
सांग मला निसंकोच
कशी कातरवेळ ही
मन भारावून जाई
सखी सोबतीला कुणी नाही
होते डोळ्यांना त्या घाई
चाहुल कशाची ती लागे
मग देवाला पाहते...
शेतकऱ्यांना असते
पाण्याची चाहुल
शेतात त्यांच्या मातीवर
पडणार पावसाचं पाऊल
मिरेची चाहुल लागताच
कृष्ण झाला राधेचा
तिच्या प्रेमासोबत
आशीर्वाद घेतला मातेचा
कितीही गाढ़ झोपेत असो
कितीही हळू टाकले पाऊल...
कुठून कशी काय माहित
माझ्या बाळाला लागते माझी चाहुल...
चाहुल चारोळीची
म्हणू की कवितेची
सगळ्या मनातल्या कल्पना
त्यांना कशा आवरू...
मोराला चाहुल होता पावसाची
नाचतो तो फुलून पिसारा
अंगांग शहारून निघते त्याचे
कशी ही किमया निसर्गाची...
लग्नाच्या नववधूला
चाहुल लागते नवीन संसारी
तिला वाटते जीवन तिचे
फुलून गेले तिच्या सासरी...
पक्षी चातक तो थोर
देतो सख्याची चाहुल
नभ सारे उतरते मग
जीव येतो थाऱ्यावर...