भयाण झालं सारं!!
भयाण झालं सारं!!


रस्त्यावर चीट पांखरू दिसेना
कोंबड,कुत्र,दिसेना,भयाण झालं सारं।
सारं कसं भयभीत झालं
ओढून आलेल्या संकटाप्रमाणे
भकास झालं सारं।
मानुस मानसाला ओळख देईना
भाऊ भावाला ओळख देईना
कशामुळे झालं हे सारं ।
कामधंदे रोजगार बुडाले,
व्यापारी कंगाल झाले
मनातल्या भीतीने झालं हे सारं।
टेस्ट करावी कि करू नये,
कळेना कुणाला
राम भरोसे झालं सारं ।
सार कसं चिडीचूप ,सांगणे नाही,
बोलणे नाही , फिरणे नाही
थंडगार पडलं हे सारं।
रस्त्यावर चीट पांखरू दिसेना
कोंबडी, कुत्र, दिसेना, भयाण झालं सारं।।