STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

भरभर उडती उंच पाखरे,

भरभर उडती उंच पाखरे,

1 min
524

भरभर उडती उंच पाखरे,

गगन निळे शेत हिरवे,

प्रभाती हे उन कोवळे,

शेततळे अन् शेतमळे.


गहू ओंबी हिरवी हिरवी,

ज्वारी आली हुरडा भरे,

करड काटेरी लाल फूले,

हरबऱ्याशी गठ भरे.


जवसाशी आली तूरे, बरे,

शेत हिरवे रानमळे,

शेती मिरच्याची लाली भरे,

काकडी पहा मंडपी लोंबे.


शेंगडी भरली कोवळी तुरे,

काटीवर पहा वाल डुले,

ऊन कोवळे, शेत हिरवे,

पाणी वाहते झुळझुळ गडे.


गाजर मुळा गोड गोड,

कोवळी पात कांदा भरे,

लसूण पहा, स्वाद घेई,

कडीपत्याचे पान हिरवे,

कोथिंबीरीस आले धने बरे,


भरभर उडती पाखरे,

आकाश कसे निळे निळे.


Rate this content
Log in